Rain alart ; पुढील 3-4 तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज (imd)
Rain alart ; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, तसेच विदर्भातील बहुतांश भागात शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कोकण, घाटमाथा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र चांगला पाऊस झालाय…
आजही कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा (मुसळधार) तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय…
हवामान विभागाने कोनकोनत्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिलाय, कुठे मुसळधार तर कुठे मध्यम पावसाची शक्यता आहे सविस्तर अंदाज या लेखातून जानून घेउयात…
Rain alart ; या जिल्ह्यात मुसळधार तर इथे हलका पाऊस
विदर्भ ; अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय…
बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना कोनताही अलर्ट नाही..
मराठवाडा ; जालना,छ.संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आसून, बिड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे..
उत्तर महाराष्ट्र (नाशिक विभाग) ; नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय…
मध्य, दक्षिण महाराष्ट्र ; पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय तर, आहील्यानगर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय..
कोकण ; कोकणातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे..
सविस्तर माहिती खालील ईमेजमध्ये पाहू शकता तसेच पुढील 5 दिवसाचा अंदाज पाहन्यासाठी 👉येथे क्लिक करा👈