Tukdebandi kayda ; तुकडेबंदी कायदा रद्द, जमीन खरेदी-विक्री करणे सोपे होणार

Tukdebandi kayda ; तुकडेबंदी कायदा रद्द, जमीन खरेदी-विक्री करणे सोपे होणार

महाराष्ट्रात धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणाऱ्या 1947 च्या कायद्यानुसार ठराविक प्रमाणापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री प्रतिबंधित होती. मात्र, आता या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत शहरी भाग, गावठाणापासून 200 मीटर पर्यंतचे क्षेत्र आणि विविध प्राधिकरणांमधील भागांत झालेले एक गुंठ्यापर्यंतचे सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत.

एक गुंठेपर्यंतच्या जमीन व्यवहारांसाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल, अशी मोठी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

लाडकी बहिन योजनेत मोठा बदल – येथे पहा 

निर्णयामुळे राज्यातील सुमारे 50 लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा मोठा फायदा होणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी येत्या 15 दिवसांत एक आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2025 नंतर अशा व्यवहारांमध्ये प्रचलित नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

या जिल्ह्यात पिकविमा येणार  खात्यात – येथे पहा 

Tukdebandi kayda जमीन खरेदी-विक्री करणे सोपे होणार

तुकडेबंदी कायद्यामुळे जमिनीचे अनेक व्यवहार प्रलंबित होते आणि नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा कायदा रद्द केल्यामुळे आता कमी क्षेत्राची जमीन खरेदी-विक्री करणे सोपे होणार आहे.

या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग, नगरविकास 1 चे अपर मुख्य सचिव, जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक अशा चार उच्च अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींना काही सूचना करायच्या असल्यास, त्यांनी अपर मुख्य सचिव, महसूल यांच्याकडे 7 दिवसांत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहनही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी केले.

सोयाबीन ; या तननाशकाचा रिझल्ट आहे एक नंबर.. टाँप 3 तननाशके👇👇

सोयाबीन तननाशक ; सोयाबीनसाठी टॉप 3 प्रभावी तणनाशके

Leave a Comment