अंदाज हवामानाचा ; राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम, आज या जिल्ह्यात पाऊस
अनेक दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश भागात पाऊस दडी मारून बसलाय…पिके पावसाअभावी सुकत आहेत तर काही ठिकाणी अजुनही पेरणी झालेली नाही त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आज राज्यातील या भागात पाऊस...
राज्यात पुढील काही तासात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार तर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय..
विदर्भ, मराठवाडा, म.महाराष्ट्र, कोकण ; सर्व जिल्ह्यांचा अंदाज हवामानाचा
मराठवाडा ; परभणी, हिंगोली, जालना, छ.संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलाय तर बिड, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यात तुरळकच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आलीय…
उत्तर महाराष्ट्र ; धुळे, नंदुरबार, जळगाव जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट तर नाशिकच्या पश्चिम भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय…
मध्य/दक्षिण महाराष्ट्र ; पुणे, सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट देण्यात आला असून सोलापूर, सांगली, अहिल्यानगर आणि घाटमाथा वगळता पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भ ; विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज कोनताही अलर्ट नसून फक्त तुरळकच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे. (अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली)
कोकण ; कोकणातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खाली दिलेल्या ईमेजमध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यासाठी कोनता अलर्ट दिलेला आहे पाहू शकता..