रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या आठवड्यात पाऊस मुसळधार बरसनार…(२४-२८ जूलै)
डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात २४ ते २८ जुलै या कालावधीत हवामानात बदल होऊन चांगल्या पावसाची शक्यता आहे. बुधवार (२४ जुलै) आणि गुरुवार (२५ जुलै) रोजी महाराष्ट्रावर १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील, तर शुक्रवार (२६ जुलै) आणि शनिवार (२७ जुलै) रोजी तो कमी होऊन १००० ते १००२ हेप्टापास्कल इतका होण्याची शक्यता आहे. या बदललेल्या दाबामुळे राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज डॉ. साबळे यांनी व्यक्त केला आहे.
लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय
त्यांच्या अंदाजानुसार (२४ ते २७ जुलै), मराठवाड्यात ४ ते ३० मिलिमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पाऊस अपेक्षित असून, पश्चिम विदर्भात ५ ते २२ मिलिमीटर, मध्य विदर्भात १० ते ३७ मिलिमीटर आणि पूर्व विदर्भात १७ ते ३३ मिलिमीटर मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत ५ ते १५ मिलिमीटर हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत १५ ते ४० मिलिमीटर मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली आहे. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असून, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात दररोज ४ ते १० मिलिमीटर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय
मागील अंदाज अचूक ठरला; आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही चांगल्या पावसाची आशा
डॉ. साबळे यांनी २ जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जून आणि जुलै महिन्यात पावसात मोठे खंड पडतील असा अंदाज दिला होता, जो १००% खरा ठरला. मात्र, सध्या हवेचे दाब अनुकूल असल्याने चांगल्या पावसाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही चांगले पाऊस होतील अशी आशा डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.
Ladki bahin update ; लाडक्या बहीनींचे पैसे जमा होनार, मोठा निर्णय