रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार…

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार…

जेष्ठ हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांनी या आठवड्यात पाऊस कसा राहील याबाबत अंदाज जाहीर केला आहे. 26 जूलैपर्यंत राज्यातील कोणत्या भागात कसा पाऊस पडेल याबाबत रामचंद्र साबळे यांनी दिलेला अंदाज सविस्तर पाहुयात..

महाराष्ट्रावर २० ते २३ जूलैदरम्यान १००२ ते १००४ हेप्टापास्कल एवढा हवेचा दाब राहनार आसल्यामुळे राज्यातील उत्तरेकडील भागात पाऊस वाढेल तर 23-26 जूलैदरम्यान हवेचे दाब आनखी कमी होउन १००० ते १००२ हेप्टापास्कल होन्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाच्या प्रमाणात आनखी वाढ होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.

रामचंद्र साबळे हवामान अंदाज

https://krushiyojna.in/wp-content/uploads/2025/07/WhatsApp-Image-2025-07-20-at-11.32.50-AM.jpeg

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार…

महाराष्ट्रावर आजपासून बुधवारपर्यंत (ता.२० ते २३) १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यानुसार महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मध्य भाग ते दक्षिण भागात पावसाचे प्रमाण साधारणच राहणे शक्य आहे. गुरुवार ते शनिवार (ता. २४ ते २६) या कालावधीत महाराष्ट्राच्या उत्तर भागावर हवेचे दाब १००० हेप्टापास्कल व मध्य भागावर १००२ हेप्टापास्कल इतके कमी होताच पावसाचे प्रमाण वाढणे शक्य आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही राहील.

या आठवड्यात वाऱ्याच्या दिशेत बदल होत असून, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्याचा परिणाम पावसाच्या वितरणावरही होईल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. हवामान बदलाच्या प्रभावाने दिशा बदल होऊन पावसाच्या वितरणावर परिणाम होत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतील पावसाच्या वितरणावर परिणाम झाला आहे.

जुलै महिना हा जास्त पावसाचा महिना असूनही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली व यवतमाळ या जिल्ह्यांत केवळ सरासरी, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा फार कमी पाऊस झाल्याचे रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

Leave a Comment