लाडकी बहीण योजना ; लाखो महिला अपात्र, तुम्हाला मिळनार का पुढील हप्ता

लाडकी बहीण योजना ; लाखो महिला अपात्र, तुम्हाला मिळनार का पुढील हप्ता 

लाडकी बहीण योजनेमुळे सध्या शासनाच्या तिजोरीवर ताण येत असल्यामुळे, पात्रतेच्या अटी अधिक कठोर करण्यात आल्या आणि त्याअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या अपात्र ठरवन्यात आलेल्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. जूनचा हप्ता न मिळालेल्या अनेक महिलांना माझा अर्ज बाद का झाला असा प्रश्न सतावत आहे.

 

लाडकी बहीण योजना ; लाखो महिला अपात्र

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद करण्यात येत आहेत. दुसरीकडे गेल्या नऊ महिन्यांपासून नवीन अर्ज नोंदणीचे पोर्टलही बंद करण्यात आले आहे. नव्याने नोंदणी होत नसल्यामुळे सुरुवातीला जेवढ्या महिला पखत्र झाल्या त्यांनाच लाभ मिळत आहे. त्यातूनही आता अर्जाची छाननी करून अपात्र लाभार्थ्यांनी वगळण्यात येत आहे..

 

तुम्हाला मिळनार का पुढील हप्ता

यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल २७ हजार ३१७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत तर संभाजीनगरमधील ८३००० महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ईतर जिल्ह्यातील आकडेवारी जरी उपलब्ध नसली तरी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. अजूनही अपात्र महिलांची पडताळणी सुरु आहे..त्यामुळे अजूनही अपात्र महिलांची नावे यादीतून कमी होन्याची शक्यता आहे.

 

लाडकी बहीण ; अर्ज बाद होण्याची प्रमुख कारणे कोणती?

सरकारी नोकरीत असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.

कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरी करत आसेल तर त्या कुटुंबातील महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत..

कुटुंबातील व्यक्ती आयकर भरत आसेल तर त्या कुटुंबातील महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत..

शासनाच्या ईतर योजनामधून महिन्याला 1500 पेक्षा लाभ घेत आसलेल्या महिलांना अपात्र ठरवले आहे…

बोगस पद्धतीने लाभ घेत आसलेल्यांनाही अपात्र करण्यात आले आहे..

 

अजून अपात्र अर्जांची पडताळणी सध्या करण्यात येत आहे. आगामी काळात आणखी महिलांची नावे कमी होण्याची शक्यता आहे…जर तुम्ही अपात्र असूनही तुमचे पैसे जमा होत आसतील तर तुम्हाला मिळनारा हप्ता बंद करण्यात येनार आहे.

Leave a Comment